१७ ऑक्टोबरला किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसे

ऑक्टोबर 15, 2025 5:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । समर्पण संस्था संचलित पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

killa

​आपल्या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा अमूल्य वारसा लाभलेला आहे. किल्ले हे शौर्याचे व धैर्याचे प्रतीक मानले जातात. दिवाळीत किल्ला बांधणे हे एक सकारात्मकतेचे बीज रुजविण्याचे प्रतीक मानले जाते. नवीन पिढीला, विशेषतः विद्यार्थ्यांना, या सर्व गोष्टींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
​या अनुषंगाने, श्रीमती एस. एल .चौधरी इंग्लिश मीडियम शाळेतर्फे दरवर्षी किल्ला बनवण्याची स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीही, शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता शाळेच्या प्रांगणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

​ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे:
​प्रथम गट: इयत्ता ५ वी ते ८ वी
​दुसरा गट: इयत्ता ९ वी ते १२ वी
​तिसरा गट: खुला गट

​या स्पर्धेमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी या पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक अशा स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now