मुक्ताईनगरात कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्युज| सुभाष धाडे | मुक्ताईनगर शहरात मुख्य चौकात रानभाजी महोत्सव आयोजन पार पडले .लोकांना रानभाज्यांचे महत्व कळावे तसेच दैनंदिन आहारामध्ये रानभाज्यांचे समावेश करावा.या हेतुने मुक्ताईनगर कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन प्रवर्तन चौकात करण्यात आले.
या महोत्सवास तालुक्यातील नागरीकांचा प्रतिसाद मिळाला. कटुरले,अंबाळी,फांग,चिऊ, यासारख्या अनेक भाज्या आयोजित महोत्सवास उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास परीसरातील शेतकऱ्यांनी भेट देऊन रानभाज्यांबाबत माहीती जाणुन घेतली. तसेच या महोत्सवास तहसीलदार श्वेता संचेती,पो.नि.शंकरराव शेळके, रोहीणी खडसे ,आमदार पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील,माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली.
प्रसंगी कृषी अधिकारी अभिनव माळी,मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार,कृषी पर्यवेक्षक अशोक पाटील,के जी महाजन, तात्यासाहेब करांडे ,कृषी सहायक सुनिल उदळकर,संदिप पाटील,आर एस जाधव,पी आर पाटील, विनोद सैदाणे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.