⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

शहराचे तापमान ४२.५ अंशांवर, उकाड्याने नागरिक हैराण

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । वातावरणातील बदलामुळे तसेच ढगाळ वातावरणाने उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात २५ ते ३० टक्के वातावरण ढगाच्छादित असल्याने उकाडा अधिक वाढला हाेता. कमाल तापमान ४२.५ अंशाच्या उच्चांकावर असताना वाऱ्याचा वेगही ताशी १४ किमीपर्यंत असल्याने उ‌ष्णतेच्या झळांनी जळगावकरांना हैराण केले.

जिल्ह्याला लागून असलेल्या विदर्भ, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात असलेल्या उष्णतेच्या लाटेचा थेट परिणाम जिल्ह्याच्या वातावरणावर झाला आहे. रविवारी राज्यात अकाेल्यात सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तर जळगावात ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. उष्ण आणि काेरड्या हवेमुळे दुपारच्या वेळी उठलेल्या वावटळीचा वेग ताशी ३० किमीपर्यंत पाेहाेचला हाेता. त्यामुळे उष्णतेच्या झळांची तीव्रता खूपच वाढल्याने उकाड्यात अधिक वाढ झाली होती.