जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार स्पर्धेचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विद्यार्थ्यांमध्ये संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार या संशोधन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अविष्कार २०२५ च्या विभागीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा रविवार दि १० नोव्हे २५ रोजी गोदावरी अभियांत्रिकीच्या सेमीनार हॉल मध्ये होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री सुभाष पाटील (चेअरमन, मास्टेक कंट्रोल्स) तर त्यांचे सोबत डॉ. उल्हास पाटील (संचालक, गोदावरी फाउंडेशन), डॉ. केतकी पाटील (सचिव), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थीत राहतील.अविष्कार या स्पर्धेची सुरुवात २००६ या वर्षापासून करण्यात आली व काळानुरूप त्यामध्ये बदल होत गेले त्या अनुषंगाने यावेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे अंतर्गत सहा वेगवेगळ्या झोन्सच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.त्यामध्ये विदर्भ, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), नाशिक/जळगाव, लातूर/नांदेड, सोलापूर/पुणे व कोल्हापूर या झोन्सचा समावेश आहे. झोनल स्पर्धेच्या आधी या झोन्सच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयीन स्तरावर अविष्कार ही स्पर्धा घेण्यात आली

त्यामध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना झोनल लेवल स्पर्धेसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आमंत्रित करण्यात येणार आहे. अविष्कार स्पर्धेसाठी सहा कॅटेगिरी च्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात येणार आहे त्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट लॉ, प्युअर सायन्स, एग्रीकल्चर निमल हसबंडरी, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिसिन फार्मसी ह्युमेनिटी लैंग्वेज फाईन आर्ट या कॅटेगिरी आहेत. झोनल लेवल नंतर युनिव्हर्सिटी तसेच राज्यस्तरावर ही स्पर्धा घेण्यात येईल त्यामध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ५००० हजार रुपये व द्वितीय पारितोषिक ३००० रुपये तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्टेट लेवल विजेत्यांना अविष्कार ग्रॅज्युएशन फेलोशिप ३००० रुपये प्रति महिना दहा महिन्यांसाठी देण्यात येणार आहे.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दिनांक १० नोव्हेंबर रोजी सर्व स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात येईल, तसेच कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजेपासून सुरू होईल.या स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून १२ पर्यवेक्षक तसेच १निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.तरी सर्व स्पर्धकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा.अविष्कार स्पर्धेमध्ये असलेल्या विषयांशी संलग्नित सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांसाठी हे अविष्कार प्रदर्शन खुले आहे, तरी नवनवीन संशोधनाच्या अविष्कारासाठी सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे समन्वयक विद्युत विभागाचे प्रा. नेमीचंद सैनी, प्रा. जयश्री पाटील यांनी मोठया संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button