⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

उद्धव ठाकरे यांच्या टीकेकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज |८ मे २०२३ |  उद्धव ठाकरे यांना आता आमच्यावर टीका करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही. असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. यावेळी ते म्हणाले कि, ठाकरेंना टीका करण्याची सवय आहे तर, आम्हाला ऐकण्याची सवय झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या सभेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. गुलाबराव पाटील यांना याबाबद प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत संयमाची भूमिका घेत उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले. (We do not pay much attention to Uddhav Thackeray’s criticism – Minister Gulabrao Patil)

तर खडसेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, बऱ्याच ठिकाणी पंचनामे झाले आहेत. तसेच शासनाकडे नोंद असते की, कोणत्या भागात पाऊस पडला व नुकसान झाले, अशा भागात पंचनामे केलेच जातात. मात्र, जर एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी पंचनामे झाले नसतील तर, त्याबाबतदेखील तहसीलदारांना आदेश देवू,