सार्वजनिक गणेशाेत्सव महामंडळाच्या महिला विभागातर्फे महिला व मुलांसाठी स्पर्धांसह महाआरतीचे आयाेजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । शहरातील महिलांसाठी दि. ५ सप्टेंबर राेजी महाआरतीचे आयाेजन संध्याकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान बॉक स्ट्रीट, नवीपेठ याठीकाणी करण्यात आले आहे. येथील विविध मंडळांमध्ये महिलांद्वारे ही महाआरती केली जाणार आहे. यात शहरातील विविध क्षेत्रातील महिला, महिला मंडळे, महिलांचे गृप यांना आमंत्रित केले जाणार असून सर्वसामान्य गृहीणी महिलांना देखील आवाहन करण्यात येणार आहे.
तसेच लहान मुलांसाठी ऑनलाईन वकृत्व आणि घरगुती आरास स्पर्धा, महिलांसाठी रांगाेळी आणि विविध गुणदर्शन स्पर्धेचेही आयाेजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी वय ७ ते १२ पहिला गट तर वय वर्षे १२ ते १६ दुसरा गट असेल यात ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव, माझ्या कल्पनेतील श्रीगणेशाेत्सव आणि काॅमनवेल्थ स्पर्धा विषय वकृत्वसाठी देण्यात आले असून यासाठी ३ मी वेळ देण्यात आली आहे. तर घरगुती श्री.गणेश आरास स्पर्धा ही सामाजिक संदेशपर आणि पारंपारीक गणेशाेत्सव याविषयावर घेण्यात येत आहे. यासाठी राहुल परकाळे ९४२२७४४३२१, सुरज दायमा ८८०६१२१२२१ या क्रमांकावर वकृत्व स्पर्धेची व्हीडीओ आणि आरास स्पर्धेचे फाेटाे आपले पुर्ण नाव, संपर्क क्रमांकासह पाठवावे. दिलेल्या क्रमांकावर फक्त स्पर्धेविषयी माहिती पाठवावी काेणीही फाेन करु नये.
तसेच महिलांसाठी महाआरती सह दि. १ सप्टेंबर राेजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव, माझ्या कल्पनेतील श्रीगणेशाेत्सव आणि काॅमनवेल्थ स्पर्धा या विषयावर रांगाेळी स्पर्धा दुपारी २ ते ३ वेळेत घेण्यात येईल. तर विविध गुणदर्शन यात पारंपारीक तसेच सामाजिक संदेशपर नाट्यछटा, एकपात्री, भारुड, नृत्य, वेशभुषा, मिमिक्री, माइम्स, लाेकनृत्य यापैकी काेणत्याही कला ३ मीनीट वेळेत सादर करावयाच्या आहेत. ७ सप्टेंबर राेजी या स्पर्धा हाेणार असून यासाठी नाव नाेंदणी आवश्यक आहे. २ सप्टेंबर पर्यंत महिलांनी ही नाव नाेंदणी करावी. तर महिलांनी आपली नावे जाेशी बंधु ज्वेम्स अँड ज्वेलरी, ८९ नवीपेठ, कै.रामभाऊ जाेशी मार्केट याठीकाणी नाेंदणी करावी. तसेच महाआरती शहरातील सर्व महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नाेंदवावा तसेच फक्त आरती करीता महिलांनी एकत्रित यावे घरुन काेणीही आरतीचे थाळी आणू नये व अधिकाधिक संख्येने यात आपला सहभाग नाेंदवून यंदाचा श्रीगणेशाेत्सव साजरा करावा असे आवाहन सार्वजनिक गणेशाेत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे व प्रकल्प प्रमुख यामिनी कुळकर्णी यांनी केले आहे.