---Advertisement---
जळगाव जिल्हा

दिव्यांग उमदेवारांकरीता जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन; कधी आणि कुठे होईल?

divyang rojgar
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल, युथ फॉर जॉब, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १० वाजता दिव्यांग उमेदवारांकरीता जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन रोटरी सभागृह, गणपती नगर, जळगाव येथे करण्यात आलेले आहे.

divyang rojgar

नोकरी इच्छुक दिव्यांग उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ज्यात १०वी, १२ वी/ सर्व शाखेतील पदवीधारक / आ. टी. आय सर्व ट्रेड/बी.ई/बी.सी.ए./ एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारकासाठी १५० पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जिल्हयातील नामांकित आस्थापनांकडे नोकरीची संधी उपलब्ध आहे.

---Advertisement---

पात्रता धारक ईच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या URLवर लॉग-इन करुन रिक्तपदांना अॅल्पाय करावयाचे आहे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्र व बायोडाटासह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७ -२९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल, युथ फॉर जॉब, हैदराबाद यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---