जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथील नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक हितेश रवींद्र जोगी यांनी शास्ती झालेली रक्कम चलनाने भरणा केली. परंतु, ही रक्कम पुनश्च त्यांच्या वेतनातून कपात करावी असे सहाय्यक आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी मुख्याधिकारी एरंडोल नगरपालिका यांना सुचित केले आहे. त्यामुळे हितेश रवींद्र जोगी यांना दणका दिल्याचे मानले जात असून या आदेशामुळे नगरपालिकेच्या गोटात खळबळ माजली आहे.
राज्य माहिती आयोग यांनी दिलेल्या आदेशानुसार हितेश रवींद्र जोगी यांच्या पगारातून कपात करण्याबाबत आदेश दिले असता आस्थापना प्रमुख आर.के. पाटिल व तत्कालीन मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली म्हणून सहाय्यक आयुक्त नपा जळगाव यांनी हितेश रवींद्र जोगी यांच्या वेतनातून कपात करून त्यांच्या गोपनीय अहवालात व सेवा पुस्तकात नोंद घेण्यात यावी असे सुचवण्यात आले आहे. याबाबत एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते आबा महाजन यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला.