⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावचे तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

जळगावचे तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । टोकरे कोळी जात प्रमाणपत्र मिळण्याच्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या आदेशाचा अनादर केल्याने जळगावचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले आहे.

सौरभ सपकाळे व जान्हवी संजय सपकाळे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जात प्रमाणपत्रासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात प्रकरण दोन वर्षांपासून दाखल आहे. त्याबाबत निर्णय न झाल्याने सपकाळे उच्च न्यायालयात गेले होते. कोर्टाने गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सुधळकर यांनी हे प्रकरण फेटाळले होते. त्या अनुषंगाने सपकाळे यांनी वेळेत व नियमानुसार सेवा न मिळाल्याने लोकसेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत प्रथम अपील दाखल केले होते.

यात सुधळकर यांच्यावर उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश व तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना विचारात घेतल्याचे निकालात नमूद केल्याचे दिसून येत नाही आदीबाबत ठपका ठेवत ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली होती. दुसऱ्या अपिलावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दंड कायम ठेवत जात प्रमाणपत्र प्रकरणात पुनर्तपासणी करून गुणवत्तेत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. तिसरे अपील लोकसेवा हक्क आयोगाकडे करण्यात आले. त्यावर सुनावणी झाली. त्या अनुषंगाने आयोगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.