⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांनो काळजी घ्या! जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

जळगावकरांनो काळजी घ्या! जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२४ । जळगावसह राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय आला आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे. यातच हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहान करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात जळगावसह राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र मागील तीन चार दिवसापासून पावसाने पुन्हा ब्रेक घेतला होता. परंतु अशातच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालाय.

राज्यात काही ठिकाणी पुढील ४,५ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार आज रविवारी आणि उद्या सोमवारी जळगाव जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच जळगाव जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी झाला. तर ३ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या आठ्वड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणातील जलसाठ्यात वाढ झाली. यात विशेष जळगाव शहरासह अनेक तालुक्यांची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक झाली. यामुळे धरण शंभर टक्के भरले. यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान आता जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली तरच जिल्ह्यातील उर्वरित प्रकल्प भरतील.यामुळं जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीप्रश्न नाहीसा होईल.

यंदा राज्यभरात ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली हजेरी लावलेली आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून लांबला आहे.
यामुळे महाराष्ट्रासह देशभरात दमदार पाऊस होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.