---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

शिंदेंनाच धनुष्यबाण मिळायला हवं : रामदास आठवले यांची मागणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या दोन तृतीयांश सदस्य संख्येचे बहुमत आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटालाच मिळायला हवे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आम्ही शिंदे सरकार कोसळू देणार नाही. सर्वांना मंत्री करता येत नाही पण मंत्री केले नाही म्हणून कुणीही आमदार शिंदे यांना सोडून परत जाणार नाही. अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीची सवय आहे. ते इकडे येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे असेही आठवले म्हणाले.रिपाइंला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेनुसार व्यापक करणार असून, सर्व समाजाला पक्षात एकत्र आणणार आहेत. त्यासाठी विविध आघाड्या स्थापन केल्या आहेत. असे आठवले यांनी सांगितले.

ramdas athavle jpg webp

लोक मोठ्या प्रमाणांत शिंदेंसोबत जात आहेत. शिंदेंनी मॅच जिंकली असून, उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. ठाकरेंना आपले आमदार, खासदार टिकवता आलेले नाहीत. फडणवीस व शिंदे यांचे सरकार गतिशील आहे. येत्या निवडणुकीत रिपाइं (आ.) पक्ष भाजपा व शिंदे यांच्या पाठिशी उभा राहणार असल्याचेही आठवले म्हणाले.
,

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---