तर जळगाव शहराला फक्त देवच वाचवेल – आ.खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । इच्छादेवी चौक ते डिमार्ट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाही स्त्याची पाहणी न करताच आमदार सुरेश भोळे यांनी मक्तेदराची बाजू घेऊन वक्तव्य केले आहे यामुळे काही विशिष्ट ठेकेदारांसाठी सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी काम करीत असतील, तर या शहराला आता परमेश्‍वरच वाचवू शकेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे.

आमदार सुरेश भोळे यांनी त्या कामाला भेट दिली नाही, जागेची पाहणी केली नाही. फक्त मक्तेदाराला वाचविण्यासाठी काम सुरू ठेवा, असे विधान करणे चुकीचे आहे.रस्त्याचा वापर वर्षानुवर्षे होणार आहे आणि दर्जाहीन काम झाल्यास ते लवकर खराब होतील व नागरिकांनाच त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

निकृष्ट दर्जाचे काम होत असताना मक्तेदारांची बाजू घेऊन सत्ताधारी गटाचे लोकप्रतिनिधी बोलत असतील, तर ही गंभीर बाब आहे. त्या शहरातील रस्त्याच्या कामांची काय स्थिती असेल हे आता दिसून येत आहे. या परिस्थितीत जळगाव शहराला आता फक्त परमेश्‍वरच वाचवू शकतो.