लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानतर्फे ‘बासरी वादना’चे ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । जळगाव येथील लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानच्यावतीने 28 जून 2021 पासून पंधरा दिवसीय विनामूल्य बासरी वादनाचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर आयोजण्यात आले आहे. यात मोजक्याच शिबिरार्थींना प्रवेश मिळणार असून आधी नोंदणी करणे आवश्यक आहे असे लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी ऑनलाईन तासिका व अभ्यास करीत आहेत. कोविड-19 च्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थी देखील मरगळलेल्या अवस्थेत आले आहेत. त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण व्हावे, कोणती तरी कला विद्यार्थ्यांना अवगत व्हावी या उदात्त हेतूने लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे.
या प्रशिक्षणासाठी सुप्रसिद्ध बासरी वादक योगेश पाटील हे प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्य परंपरेतील खान्देशातील चाळीसगाव चे सुपुत्र पं. विवेक सोनार यांच्याकडून त्यांनी बासरी वादनाचे धडे गिरविले आहेत. या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी [email protected] या ई-मेल अथवा 9823052188 व्हाट्सएपवर अग्रीम नोंदणी करावी.
प्रशिक्षक योगेश पाटील यांचा परिचय
नाव- बासरी वादक योगेश सुभाष पाटील
गाव- एरंडोल जिल्हा जळगाव.
बासरी गुरु परंपरा
पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया यांचे जेष्ठ शिष्य खांन्देश सुपुत्र व
खांन्देश रत्न पं.विवेक सोनार
१) ठाणे व मुंबई येथील दरवर्षी असणार्या बासरी उत्सव मघे १० वर्षा पासुन सहभाग.
२) खान्देशात स्वतः आयोजित पंन्नास बासरी वादक शिष्यांनसह कार्यक्रम २०१७ पासुन घेत आहेत.
3) आठ वर्षांपासून काही गरीब मुलांना मोफत बासरी शिक्षण देले. देत आहेत.
4) बासरी शिकवण्यासाठी आठवळ्यात एरंडोल गावासह वरुन जळगाव, चोपडा, अंमळनेर, धुळे जातात. पाहुणा कलाकार म्हणून नंदुरबार औरंगाबाद तसेच सद्या Online क्लास मधे पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती,परभणी, अहमदाबाद, तसेच बॅंगलोर येथील शिष्य घडवत आहेत.
5) कोरोना काळात एक महिना सलग तिस दिवस नविन शिष्यांना मोफत बासरी वादन शिकवले.
6) शिष्यांन मधे डॉक्टर, वकिल, व्यापारी, शेतकरी, अधिकारी, शालेय विद्यार्थी शिक्षक असे सगळे शिष्य आहेत.
7) त्यांच्याकडे बासरी वादन शिकवलेले इंडियन नेव्ही, पोलिस बॅंड, काही कलावंत झाली हाच त्यांचा पुरस्कार ते मानतात.