जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । येथील ब्रह्मश्री परिवारातर्फे नुकतीच तरसोद गणपती मंदिर पायी वारी काढण्यात आली. या वारीस कृषी कॉलनीतील नवसाचा गणपती मंदिरापासून सुरुवात झाली.
सकाळी ६ वाजता आरती होऊन नूतन मराठा कॉलेज, चित्रा चौक, कालिका माता मंदिर मार्गे ही वारी मंदिरात पोहोचली. या वारीत १५ वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यंत स्त्री-पुरुष सहभागी झाले हाेते. तरसोद येथील मंदिरात वारी पोहोचल्यावर अथर्वशीर्ष व आरती होऊन वारीची सांगता झाली. ब्रह्मश्री परिवारातर्फे ही चौथी वारी काढण्यात आली.