भुसावळातील रेल्वे ठेकेदाराला तब्बल ४० लाख ९६ हजाराचा लावला चुना; अशी केली फसवणूक

डिसेंबर 26, 2024 5:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांना गंडविले जात आहे. आता अशातच भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून एका रेल्वे ठेकेदाराला तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणात संशयित आरोपीविरोधात जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

याबाबत असे की, गौरव अनिल मनवानी, शांती नगर, भुसावळ यांच्याकडून संशयित आरोपी श्रीकांत मिश्रा याने लोखंडी सळईचा माल पुरवतो म्हणून आमिष दाखविले. मिश्राने स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून, वेळोवेळी ऑनलाईन एनएफटीद्वारे पैसे घेतले. परंतु मनवानी यांना लोखंडी सळईचा माल न देता आणखी पैशांची मागणी केल्यामुळे त्यांनी शेवटी जळगाव सायबर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीच्या विरोधात कार्यवाही सुरू केली आहे आणि त्याच्या धरपकडीचे प्रयत्न सुरू आहेत.

नागरिकांचे सावधानी बाळगण्याचे आवाहन
भुसावळ शहरातील ही घटना ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांच्या वाढत्या संख्येचा पुरावा आहे. नागरिकांनी सावध राहून अशा फसवणुकींपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात जलद कार्यवाही करून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now