त्या लिंकला क्लिक करताच शेतकऱ्याच्या खात्यातून सव्वा दहा लाख गायब; एकदा बातमी वाचाच..

ऑक्टोबर 17, 2024 4:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच सायबर ठगांने रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील शेतकऱ्याच्या खात्यातून १० लाख २४ रुपये वळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud crime jpg webp

नेमकी कशी झाली फसवणूक?
रावेर तालुक्यातील केऱ्हाळा गावात ४५ वर्षीय शेतकरी हे परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती करून ते उदरनिर्वाह करतात. दि. १० ऑक्टोबर रोजी त्यांना त्यांच्या व्हॉटसॲप मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून एका बँकेच्या नावाने एपीके फाईल पाठविण्यात आली. शेतकरी यांनी ॲपच्या लिंकला क्लिक केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेवून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १० लाख २४ हजार रूपये अन्य खात्यात ऑनलाईन वळवून फसवणूक केली आहे.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी यांनी सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now