शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

एप्रिल 30, 2026 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिक या घटकांची अंमलबजावणी महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

farmer biyane jpg webp

त्याअनुषंगाने अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक हे घटक महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविले जातात. सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक या घटकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विंडो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुर, मुग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावेत.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता सन २०२६-२७ अंतर्गत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व अभियान कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी सुधारीत वाणांचे दर्जेदार बियाणे पुरवठा वेळेवर होणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त शेतक-यांनी या प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्याक्षिक या घटकांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या उपविभागीय कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now