⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कांद्याला भाव मिळेना : बेहाल शेतकरी आत्ता करणार अनोखं आंदोलन

जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | वाकोद‎ शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या‎ कामास जोमाने लागले असून सर्वत्र‎ शेत नांगरणीची कामे सुरू आहेत.‎ परंतु घसरलेल्या कांद्याच्या दरातून ‎ ‎उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे‎ खरीप पिकांसाठी आर्थिक नियोजन‎ कसे कराववे, या चिंतेत शेतकरी‎ सापडले अाहेत. त्यामुळे कांद्याचे दर ‎ ‎ वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करत‎ आहेत.‎ वाकोद येथील राजू शिरसाठ यांनी ‎ ‎ कांदा लागवड केली हाेती.

त्यांना ‎ ‎ जवळपास ५० क्विंटल कांद्याचे‎ उत्पन्न झाले. परंतु, कांद्याचे भाव ‎ ‎ घसरल्यामुळे कांदा घेण्यासाठी कुणी ‎ ‎तयार होईना. तर वाढत्या उष्णतेमुळे ‎ ‎ खराब व सडलेला निम्मे कांदा त्यांना ‎ ‎ फेकावा लागला. हा कांदा‎ लागवडीसाठी त्यांना जवळपास ६० ‎ ‎ हजार रूपये खर्च आला हाेता. परंतु, ‎ ‎ आतापर्यंत एक रुपयाही उत्पन्न‎ हातात आलेले नाही. तर हा खर्च ‎ ‎ भागवताना शेतकरी कर्जबाजारी‎ झाला आहे. आगामी खरिपाचे‎ नियोजन कसे करावे, ही समस्या‎ अाता शेतकऱ्यांपुढे उभी राहिली‎ आहे.

सध्या कांदा हाच एकमेव‎ ‎ ‎आर्थिक स्रोत देणारा घटक‎ असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.‎ घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची‎ चिंता वाढली आहे. कांद्याला उत्पादन‎ खर्चावर आधारित प्रति क्विंटल तीन‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ हजार रुपये बाजारभाव द्यावा, अशी‎ मागणी हाेत असली तरी सध्या‎ व्यापारी हजार रूपये क्विंटलने‎ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करुन‎ नेण्यासाठी तयार नाहीत.‎

चोपडा‎ राज्यासह देशात मागील काही‎ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला‎ बाजार समिती व नाफेडतर्फे उत्पादन ‎ ‎ खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे ‎ ‎ शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत ‎ ‎ अाहे. यात पार्श्वभूमीवर सर्वच ‎ ‎ लाेकप्रतिनिधींचे कांदा-प्रश्नी लक्ष वेधून ‎ ‎ घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर ‎ ‎ करणाऱ्या सर्वच कांदा उत्पादक‎ शेतकऱ्यांनी लाेकप्रतिनिधींच्या सोशल ‎ ‎ मीडियावरील व्हिडिओज आणि ‎ ‎ मेसेजेसजच्या खाली कमेंट्स‎ बॉक्समध्ये जाऊन ‘शेतकऱ्यांच्या‎ कांद्याला तत्काळ ३० रुपये प्रति किलोचा ‎ ‎ भाव द्यावा’, अशी मागणी करावी. ही‎ मागणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी‎ अशा भाषेत कमेंट्स कराव्यात, असे‎ रघुनाथ-दादा पाटील प्रणित शेतकरी‎ संघटनेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र‎ विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी‎ आवाहन केले आहे.‎ कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात‎ काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या‎ केलेल्या अाहेत. तर काही शेतकऱ्यांनी‎ आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. कांदा‎ दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये‎ संतापाची भावना असताना राज्य व‎ देशातील लाेकप्रतिनिधींचे मात्र कांदा‎ प्रश्नावरती सोयिस्कररित्या दुर्लक्ष होत‎ आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय‎ मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री,‎ पंतप्रधान या सर्वांच्याच सोशल‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

‎ ‎ ‎ ‎ ‎ मीडियाच्या माध्यमातून करण्यात‎ येणाऱ्या पोस्टमध्ये कांदा उत्पादक‎ शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या‎ बाजार भावात तात्काळ सुधारणा व्हावी‎ व कांद्याला कमीत कमी ३० रुपये‎ किलोचा दर मिळावा. कांद्याची‎ अधिकाधिक निर्यात करावी, यासाठी‎ हजारो कमेंट्सच्या माध्यमातून आवाज‎ उठवावा. केलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट‎ काढून शेतकऱ्यांनी आपापल्या सोशल‎ मीडियाच्या माध्यमातून शेअर करावेत.‎ कांद्याचे दर वाढण्यासाठी रास्ता रोको,‎ मोर्चे यासारखे आंदोलने तर सुरूच‎ राहतील. परंतु आता शेतकरी संघटनेच्या‎ नेतृत्वात राजकीय नेत्यांच्या सोशल‎ मीडियाच्या पोस्टला शेतकऱ्यांनी कमेंट्स‎ देवून संबंधित नेत्यांचे कांदा प्रश्‍नाकडे‎ लक्ष वेधून घ्यावे.‎


नशिराबाद ग्रामदैवत‎ झिपरू अण्णा महाराज यांच्या ७३‎ व्या पुण्यतिथी सोहळ्याची‎ मंगळवारी श्रींच्या पादुका पालखी‎ मिरवणुकीने सागंता होत आहे.‎ मंगळवारी सकाळी श्रींना‎ अभिषेक, पूजन होईल. सकाळी ७‎ वाजता श्रींच्या समाधि मंदिरापासून‎ पालखी मिरवणुकीस प्रारंभ त्यानंतर‎ काल्याचे कीर्तन हाेईल.‎