जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मोठी पदभरती निघाली आहे. विशेष दहावी पास ते पदवीधर उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरतीद्वारे एकूण 2236 जागा भरल्या जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. या अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने अर्ज NAPS पोर्टल apprenticeshipindia.gov.in किंवा NATS पोर्टल nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
रिक्त पदाचे नाव : ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
विभागीय पदनिहाय रिक्त जागा :
1) उत्तर विभाग – 161
2) मुंबई विभाग- 310
3) पश्चिम विभाग – 547
4) पूर्व विभाग – 583
5) दक्षिण विभाग – 335
6) मध्य विभाग – 249
शैक्षणिक पात्रता :
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)
या भरतीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.
इतके स्टायपेंड मिळेल?
या अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. आयटीआय पदवी प्राप्त उमेदवारांनी ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तसेच ट्रेड अप्रेंटिससाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
जाहिरात पहा : Click Here
शुद्धीपत्रक : PDF