भरधाव आयशरच्या धडकेत चार बैलसह पादचारी ठार; पाल नजीक घटना

सप्टेंबर 29, 2024 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२४ । पाल येथून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. भरधाव आयशर ट्रकने बैल घेऊन जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने पादचारी व चार बैल ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

शेख फिरोज शेख गंभीर (रा. बहादरपूर, जि. बऱ्हाणपूर, ह. मु. पाल) हा शुक्रवारी दि. २७ रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पालहून रावेर येथील शुक्रवारच्या बाजारात बैल विक्रीसाठी घेऊन येत असताना हबीब तडवी यांच्या पेट्रोलपंपासमोर भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच १९, झेड ५२८५) जोरदार धडक दिली. यात पादचारी शेख फिरोज शेख गंभीर हा व चार बैल जागीच ठार झाले.

याबाबत शेख नजीम शेख रफीक यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक पिंटू (पूर्ण नाव माहित नाही) हा फरारी झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now