⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

चिंचोलीच्या एकास विनाकारण ११२ डायल करणे पडलं महागात!

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । चिंचोलीच्या एकास आपत्कालीन डायल 112 वरून दूरध्वनी करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला अटक केले असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास अशोक कोळी असे चिंचोली ता.यावल, अटक संशयिताचे नाव आहे. कोळी याचा रविवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपत्कालीन दूरध्वनी क्र. ११२ वर दूरध्वनी आल्याने पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ अशोक पाटील यांनी तात्काळ नरेन्द्र बागुल, राहील गणेश, शामकांत धनगर अशांनी त्यास विचारणा केली. कोळी याने पोलिसाना तुम्ही काही करू शकत नाही असे म्हणून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. दरम्यान, पोलिसांनी कोळी यास यावल पोलीस ठाण्यात शासकीय वाहनातून आणत असताना, वाहनातील बिनतारी यंत्रणेस लाथा मारून तोडफोड करून नुकसान केले.

दरम्यान, पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांनी त्यास फोन बाबत विचारणा केली असता त्यांनाही कैलास कोळी याने शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेला. तर सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान व फीर्यादी पो. काॅ. जगन्नाथ पाटील यांचे हाताला चावा घेतला. या कारणावरून कैलास कोळी याचे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे यासह विविध कलम अन्वये यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.