⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | शेतकऱ्याला लावला एक लाखाचा ऑनलाईन चुना ; अशी झाली फसवणूक

शेतकऱ्याला लावला एक लाखाचा ऑनलाईन चुना ; अशी झाली फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 31 जानेवारी 2024 | मागील गेल्या काही काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या असून यात विविध मध्यातून लोकांना गंडविले जात आहे. अशातच अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील शेतकऱ्याला एक लाखांपर्यंचा ऑनलाईन चुना लावण्यात आला आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
शरद गुलाबराव पाटील वय-४१ रा. कलाली ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. 30 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ते अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील बँकेत असताना त्यांना अज्ञात खातेदाराने त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ हजार रुपयांची रक्कम विनापरवानगी ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक केल्याचे समोर आले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी शरद पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता मारवाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.