⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

पक्षप्रवेशाविना एकनाथ खडसे भाजप कार्यालयात ; बैठकांमुळे कार्यकर्ते गोंधळात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज : ३ मे २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची साथ सोडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वत: आपण पुन्हा स्वगृही भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाला अजून मुहूर्त मिळत नाही. मात्र अशातच एकनाथ खडसे सून आणि भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजप कार्यालयातून त्यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे. पक्षप्रवेशाविना खडसे भाजप कार्यालयात बैठका घेत असल्याने भाजपचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्यांचा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही. पक्ष प्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात जावून बसले. त्यांनी भाजपच्या कार्यकत्यांना प्रचाराबाबत सूचनाही केल्या. बैठकाही घेतल्या. पक्षात नसताना खडसेंच्या या बैठकांमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. माझा भाजप पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यामुळे आपण प्रचारात उतरल्याचे खडसेंनी यावेळी सांगितले.

पक्षप्रवेशाबाबत काय म्हणाले?
“मी वरिष्ठांकडे माझ्या भाजप प्रवेशाबाबत मी सूचित केले होते. त्यानुसार भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे तसेच भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार? असे त्यांना विचारले असता त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे. बैठका घेण्यास व प्रवास करण्यास हरकत नाही, असं सांगितल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.