⁠ 
बुधवार, मे 8, 2024

लग्न जुळवण्याच्या नावाखाली एक लाखाची फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । एरंडोल येथील पुरे भागातील रहिवासी दीपक रामदास चौधरी यांच्याकडून लग्न जुळवण्याची बतावणी करत १ लाख रुपये मागून वधूसह अन्य दोन आरोपींनी पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी एरंडोल पोलिसांत गुरुवारी रात्री ऑनलाई गुन्हा दाखल झाला.

येथील पुरे भागातील रहिवासी रामदास धनगर चौधरी यांचा मुलगा दिपक रामदास चौधरी यांच्यासोबत आरोपी वच्छला चौधरी ( वय ६०) रा. आझाद चौक पारोळा, पंचम भैय्यालाल नगरे ( वय ५०) रा. धामणे वाडा ता. जि. गोंदिया यांनी वधू अपेक्षा सुरेश परघरमोर ( वय २७) रा. वाडी नागपूर हिचे लग्न जुळवण्याची बतावणी करत रामदास चौधरी यांच्या राहत्या घरून एक लाख रुपये घेतले व त्यांच्या मुलासोबत अपेक्षा परघरमोर हिचे लग्न न लावता तिघा आरोपींनी पलायन केले व एक लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी रामदास चौधरी यांनी पोलिसांत फिर्यादी दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला. हेन्स्टेबल अनिल पाटील पंकज पाटील राजेश पाटील जुबेर खाटीक मिलिंद कुमावत पुढील तपास करीत आहेत.