जळगाव शहर

के.सी.ई.अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅक विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । खान्देश एजुकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनल क्वालिटी अशु रन्स विभाग तर्फे टेक्निकल एज्युकेशन मध्ये नॅक चे महत्त्व याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. इन्स्टट्यूट ऑफ मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च च्या डायरेक्टर डॉ. शिल्पा बेंडाळे ह्या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी , प्रा. संजय दहाड उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन इंटरनल क्वालिटी अशुरन्स विभागाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा विखार याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने नॅक विषयावर संपूर्ण प्रोसेस आणि मूल्यमापन पद्धत सविस्तरपणे समजावून सांगितली. नॅक मुळे होणाऱ्या गुणवत्ता सुधार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सहभागी प्राध्यापकांच्या प्रश्नांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक यांनी उपस्थिती दर्शवली. प्रा. शेफाली अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. हर्षा देशमुख यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल पाटील, प्रा. अविनाश सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button