जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा प्राचार्य व रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल व उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ येथील प्राचार्य डॉ. आर.पी. फालक, तर प्रमुख अतिथी म्हणून रासेयोचे सल्लगार समीती सदस्य प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने व विद्यापीठाच्या रासेयो विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे हे होते.
प्राचार्य डॉ. आर.पी. फालक यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळेच्या माध्यमातून हिवाळी शिबिरामध्ये होणारे उपक्रम तसेच राज्यस्तरीय व देशपातळीवरील वेगवेगळ्या शिबिराबद्दल रासेयो कार्यक्रम अधिकारी यांना योग्य माहितीचे आदान-प्रदान होऊन याचा निश्चितच फायदा महाविद्यालयांना होतो असे सांगितले. सुरुवातीला रासयोगीत गायनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रासयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल बारी कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी आपल्या मनोगतामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाविद्यालयाचा कणा असून या विभागाच्या माध्यमातून अष्टपैलू युवक घडवण्याचे महान कार्य केले जाते असे मत मांडले.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये केंद्र शासन महाराष्ट्र शासन तसेच विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार विविध उपक्रमांचे आयोजन व त्यांचे नियोजन रूपरेषा सादर करून सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. मिठूलालजी अग्रवाल यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आदर्श युवक व समाजसेवक घडवण्याचे महान कार्य केले जाते व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी हे सदर आदर्श युवक घडवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात यामुळेच अशा कार्यशाळांचे आयोजन होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
कार्यशाळेचा प्रथम सत्र मध्ये राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉक्टर मनिष करंजे यांनी राष्ट्रीय सेवा योजना लेखापरीक्षण कार्यपद्धती याबद्दल उपस्थित कार्यक्रम अधिकारी यांना सखोल मार्गदर्शन केले तर द्वितीय सत्र मध्ये विभागीय समन्वयक डॉ. संजय शिंगाणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना आव्हाने व उपाय योजना या विषयावर उपस्थित सर्व कार्यक्रम अधिकारी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी समारोप सत्रामध्ये संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी उपस्थित कार्यक्रम अधिकारी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले व येणाऱ्या काळामध्ये सर्व कार्यक्रम अधिकारी यांनी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले या वेळी विभागीय समन्वयक डॉ. आशुतोष वर्डीकर, डॉ. नितीन बडगुजर व डॉ. जगदीश सोनावणे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी जळगाव जिल्हातील महाविद्यालयातील २० प्राचार्य व ७५ कार्यक्रम अधिकारी, महिला कार्यक्रम अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना नंदवे यांनी केले तर आभार डॉ. ईश्वर म्हसलेकर यांनी मानले. कार्यशाळेचे यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल बारी, डॉ. माधव वराडे, डॉ. वंदना नंदवे, डॉ. ईश्वर म्हसलेकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व स्वयंसेवक संभाजी टिकारे, निवृत्ती चौधरी, मोहन ताठे, दीपक वाणी, ऋषभ बावस्कर, ऋषिकेश पाटील, गौरव सुलताने, कुंदन डोळे, क्रिष्णल किनगे, नेहा माळी, प्रणाली, मिताली, प्रज्ञा व शारदा या स्वयंसेविका उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र शर्मा यांनी कळविले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे आयोजित विविध कार्यक्रमाचे नियोजन व अमलबजावणी करून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले- प्राध्यापक अरविंद चौधरी, प्राचार्य