Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल येथे विखरण रोड लगत आशाबाई उर्फ स्वाती ऋषिकेश मराठे (वय २१) या विवाहितेची येथील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तिची प्रस्तुती झाली. तिने बाळाला जन्म दिला त्याचा आनंद ती घेत असताना अवघ्या २४ तासात तिची प्रकृती खालावली व तिला ऑक्सिजन लावून जळगावला पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेवर मृत्यूने तिला आलिंगन दिले.
नवजात अर्भक घरी असून आईची वाट पाहत आहे आईची वाट पाहत आहे जणू आपली आई केव्हा परत येईल याची त्या बालकाला प्रतीक्षा तर नसेल ना ? पण अवघ्या एक दिवसाच्या बालकाला जन्म मृत्यूचा खेळ कसा समजणार एकीकडे बाळाच्या जन्माचा कुटुंबाला झालेला आनंद तर त्याचवेळी स्वातीचे झालेल्या आकस्मित निधन अशी विचित्र स्थिती निर्माण झाल्यामुळे मराठी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
स्वाती मराठे तिचे माहेर व सासर एरंडोल येथीलच आहे. तिला दिवस गेल्यापासून घरामध्ये आनंदाचे वातावरण होते आपल्या वंशाला दिवा मिळेल असे स्वप्न तिच्या पतीसह सासू-सासरे हे पाहत होते त्यांचे स्वप्न खरेही ठरले. परंतु नियती वेगळा डाव खेळली. बाळाचे दर्शन घेऊन आईचा आनंद गगनात मावत नव्हता कुटुंबात देखील आनंदी वातावरण निर्माण झाले मात्र शनिवारी दुपारी तिची प्रकृती अचानक बिघडली आणि बाळाला जन्म दिल्याचा आनंद अवघ्या २० ते २२ तासापर्यंतच तिला लाभला तिला ऑक्सिजन लावून जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असता वाटेवरच मृत्यूला तिने कवटाळले.