---Advertisement---
जळगाव जिल्हा विशेष

अबब.. जगात एक अब्ज लोक मानसिक आरोग्याने ग्रस्त!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । आजच्या धकाधकीच्या काळात दरदिवशी आत्महत्येची एक दुःखद बातमी आपल्या कानावर येते. बऱ्याच वेळा आत्महत्येमागे नैराश्य हेच कारण समोर येते. आत्महत्येमागे हे एकच कारण पुरेस नसत मुळात आत्महत्या करणे म्हणजे मानसिक संतुलन व आरोग्य कुठं तरी कमकुवत होण्याचे हे परिणाम असतात. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस असून जगभरात १० ऑक्टोबर साजरा केला जातो. जगभरात तब्बल १ अब्ज नागरिक मानसिक आरोग्याच्या त्रासाने त्रस्त आहेत.

one billion people in the world suffer from mental health

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृकता पसरवण्याचा व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ती मदत पोहचवण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. वर्ल्ड फेडरेशनकडून या दिनाचे आयोजन करण्यात येते. मानसिक आरोग्य चांगले नसणे म्हणजे मानसिक अस्वस्थता व तणाव आहे. निरोगी आयुष्य म्हणजे मानसिक आरोग्य चांगले ठेऊन निरोगी राहणे, जीवनातील अडचणींना सामोरे जाणे हे आहे. आज मानसिक आरोग्याबद्दल बरेच लोक जागरूक नसल्याचे दिसून येते.

---Advertisement---

आजच्या काळात अनेक लोक मानसिक आरोग्याला घेऊन नकारात्मक झाले असून याबद्दल ते कोणाजवळ बोलायला देखील पसंत करत नसतात. जितकं आपण शारीरिक आरोग्य जपतो तितकच मानसिक आरोग्य जपणे देखील गरजेचं आहे व याबद्दल जनजागृती करणे हि तितकीच गरजेची झाली आहे. म्हणून आज १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

कोरोना महामारीने लोकांच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम केला आहे. अचानक आलेले संकट यातून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे मनावर दडपण, भीती, चिंता, राग, चिडचिडेपणा सर्व वयोगटातील व्यक्तीवर होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार जगात एक अब्ज लोक मानसिक आजाराने, वेगवेगळ्या व्याधीने ग्रस्त आहेत. म्हणून हवं तितकं मानसिक आरोग्याकडेही आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---