जळगावातील बॅटरी चोरी घटनेतील दोन संशयित जेरबंद

मे 22, 2025 12:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२५ । जळगाव शहरात बॅटरी चोरीचे प्रकार वाढले असताना, एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत एका चोरीचा छडा लावला आहे. अजिंठा चौफुली येथील चौधरी बॅटरी ट्रेडिंग या दुकानातून ४१ जुन्या बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी तेल्हारा, जि. अकोला येथून अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

bateri chori

सविस्तर वृत्त असे की सुप्रीम कॉलनी येथे राहणारा अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी वय ४७ वर्षे याच्या चौधरी बैटरी ट्रेडींग या दुकानातून १७ मे रोजी 8 वाजता ते १८ मे च्या ०८ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर वाकवून दुकानातील ४१ हजार रुपये किमतीच्या जुन्या ४१ बॅटऱ्या चोरुन नेल्या होत्या या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.वेगाने तपासाची चक्रे फिरवुन, घटनास्थळाचे व आजुबाजुचे सिसिटीव्ही फूटेजची पाहणी केली असता गुन्हा करण्यासाठी आरोपींनी पांढरे रंगाचे बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केलेला दिसून आला.

याबाबत गोपनिय माहीती तसेच तांत्रीक माहीतीचे विश्लेषन करुन गुन्ह्याचे तपासात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथून आरोपी अजमदउल्ला अमानतउल्ला खान वय २४ वर्षे रा. पिंपळगाव राज ता.खामगाव जि. बुलढाणा, सेव्यद दानिश संव्यद ईसमाईल वय २५ वर्षे रा घोडेगाव, ता. तेल्हारा जि. अकोला यांना २० रोजी अटक करण्यात आलेली आहे.आरोपी कडून गुन्द्वातीत चोरीस गेलेल्या ३१ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या व गुन्ह्यात वापरलेले ६ लाख रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आलेले असून एकूण ६ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. २४ तासाचे आत हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment