सोमवार, डिसेंबर 11, 2023

बाबो..! एक-एक करून त्याने 26 दुचाक्या लांबविल्या, पोलिसांनी अशा आवळल्या चोरट्याच्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. त्यात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. दरम्यान, 19 लाख 58 हजार 139 रुपयाच्या किमतीच्या 26 दुचाक्यांसह चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे.

नेमकी घटना काय आहे?

भडगाव येथील एका साई अँटो बजाज शो रुममधील तब्बल 30 दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी संबंधित शो रूमचे मालकास स्टॉक बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांच्या स्टॉकमधून 14 पल्सर मोटार सायकल व 16 प्लॅटीना मोटार सायकल असे एकुण 30 मोटार सायकल 22,77,980 रुपये किंमतीच्या कमी असल्याच सांगितले.

यांनतर पथकाने स्टॉकमधील कर्मचाऱ्यांना विचारपुस करून संशयीत शोएब खान रऊफ खान, रा.नगरदेवळा ता.पाचोरा यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदर शो रुम मधून साधारण तीन महिन्या पासून वेळोवेळी जशी संधी मिळेल असे 1-1 मोटार सायकल बाहेर काढून इतरांना कमी पैश्यात विकत होता.

त्याला विश्वासात घेवून त्याने ज्या व्यक्तींना विकलेल्या आहेत अश्या व्यक्तींना निष्पन्न करीत आहोत. त्यांचे कडून 11 पल्सर मोटार सायकल व 15 प्लॅटीना मोटार सायकल असे एकुण 26 मोटार सायकल 19,58,139 रुपये किंमतीच्या मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपासकामी भडगाव पोलीस स्टेशन गुरनं १७१/ २०२३ भादवि कलम ३८० या गुन्ह्यात आरोपी व मो.सा. हे पुढील तपास कामी देण्यात आले आहे.