दुर्दैवी ! दीडवर्षीय बालकाचा सेप्टिक टॅँकमध्ये पडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२। खेळत असताना सेप्टिक टँकमध्ये पडल्यामुळे दीडवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पारोळा तालुक्यातील इंधवे येथे घडली. ध्रुव राहुल पाटील असे मृत बालकाचे नाव आहे. मुलगा दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याने पालकांनी आक्रोश केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,

याबाबत असे की, इंधवे येथील शेतकरी राहुल पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी घरालगतच सेप्टिक टँक आहे. सध्या या सेप्टिक टँकमध्ये पाणी भरलेले आहे. गुरुवारी सकाळी शेतकरी पाटील यांचा मुलगा ध्रुव हा खेळताना सेप्टिक टँकमध्ये पडला. दुसरीकडे ध्रुव घरात दिसत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला.

गावभर शोध घेतला. दुपारी सेप्टिक टॅँकमध्ये त्याचा मृतदेह आढळला. एकुलता एक मुलगा दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याने पालकांनी आक्रोश केला. उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद नव्हती.

हे देखील वाचा :