⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | भुसावळ शहर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं

भुसावळ शहर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 25 ऑक्टोबर 2023 : भुसावळ शहरात गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नसून आणखी एका खुणाची घटना समोर आलीय. विजयादशमी अर्थात दसर्‍याच्या रात्री दिलीप जोनवाल ( वय ४९, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघात हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
भुसावळ शहरासह परिसरात वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून विविध पाऊले उचलली जात आहे. अलीकडच्या काळात खुनांची सुरू असलेली मालिका कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

यातच मंगळवारी रात्री खुणाची घटना समोर आली असून रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कृत्याला पूर्व वैमनस्याची जोड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.