---Advertisement---
हवामान

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा ; ‘या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ । गेल्या आठवड्यात राज्यभात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले होते. काही जिल्ह्यांना अवकाळाची तडाखा बसला होता. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा दिला आहे.

rain jpg webp webp

हवामान विभागाने शुक्रवारी (14 एप्रिल) दुपारी वर्तववलेल्या ताज्या अंदाजानुसार, आजपासून पुढील चार दिवस कोकणासह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण असेल. तसेच राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामाना खात्याकडून नागरिकांना विजेच्या धोक्यांपासून सर्व सुरक्षा आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---Advertisement---

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या ट्वीटमध्ये पिवळ्या इशाऱ्यांसह दर्शविल्या गेलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआहे.ज्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तिथे वादवळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना गारपिटीचा धोका?

हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यात बीड आणि उस्मानाबादसह अहमदनगरलाही ऑरेन्ज अलर्ज जारी केला आहे. या भागात 14 एप्रिल रोजी गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची आणि जणावरांची काळजी घेण्याचे आवाहान करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---