खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून प्रतिमापूजन व माल्यार्पण
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार व जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामीण सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या स्वखर्चाने बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भाजपा दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सिमाताई भोळे, नगरसेवक खडके, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, प्रा. भगतसिंग निकम, मनोज (पिंटू) काळे, नगरसेविका सुचिताताई हाडा, दीपमालाताई काळे, महिला आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख व मंडळ सरचिटणीस धीरज वर्मा, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, आघाडीचे प्रमोद वाणि, प्रल्हाद सोनवणे, अनिल जोशी सर, हेमंत जोशी, पूजाताई चौधरी, सुनीताताई चौधरी, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.