शेतात पेटला वणवा, शेतमजुराची झोपडी जळाली, संसारोपयोगी वस्तू खाक

मार्च 2, 2022 4:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । उन्हाचे चटके जाणवू लागताच आग लागण्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत. जळगाव विमानतळाच्या पुढे कुसुंबा गावाजवळील एका शेतातील गवताला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यात एका शेतमजूर कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

fire jalgaon

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या कुसुंबा येथील विमानतळाच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील गवताला अचानक लाग लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अवघ्या २० मिनीटात बंब घटनास्थळी पोहचला आणि ही आग विझविण्यात आली.

शेतालगतच विलास पावरी (बारेला) कुटुंबिय वास्तव्याला आहे. आगी लोळमध्ये कुटुंबिय राहत असलेली झोपडी देखील सापडली. त्यात बारेला कुटुंबियाच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहे. अग्निशमन विभागाचे पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आहे. यासाठी अग्निशमन बंबाचे वाहन चालक वसंत न्हावी, भगवान जाधव, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांनी परिश्रम घेतले. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलीसात नोंद करण्यात आलेली नसून आगीचे कारण देखील समजून आलेले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now