⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | पद्मालयला अंगारिका चतुर्थी निमित्त भाविकांची अलोट गर्दी, ८० हजार भाविकांनी घेतले गणरायाचे दर्शन!

पद्मालयला अंगारिका चतुर्थी निमित्त भाविकांची अलोट गर्दी, ८० हजार भाविकांनी घेतले गणरायाचे दर्शन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय येथे अंगारिका चतुर्थी निमित भाविकांची सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी वातावरण गढाळ असताना सुध्दा वाढत गेली. देवस्थान निसर्गरम्य परिसरात असलेल्या सुंदरशा तळ्याकाठी वसलेले आहे. डाव्या व उजव्या सोंडेचे दोन स्वयंभू एकाच सिंहासनावर विराजमान असलेले जागृत देवस्थान आहे. प्रवाळ रत्नापासून बनलेल्या या आकर्षक गणेश मुर्ती अतिशय जागृत असल्याने दर्शनासाठी भाविकांची या क्षेत्री वर्षभर गर्दी असते.

भारतातील अडीच गणेश पिठांपैकी अर्धे पीठ असल्याने हे देवस्थान ५०० वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज आहे. मदीराच्या कळसाचे लांबूनच दर्शन घडते. अंगारिका चतुर्थी निमित्त सुमारे ८० हजार भक्तांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. सकाळी महापूजा, पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या शुभहस्ते “श्री ” ची महापूजा व आरती सोहळा पार पडला.

या प्रसंगी अमळनेरचे केशवराव पुराणीक यांनी अभिषेक पूजा केली मंदिर पहाटे ५ वाजे पासून उघडण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व रिंगणगांव प्रा.आरोग्य केंद्र, कासोदा , तळई पी.एच.सी चे स्टाफ तसेच डॉ. कोल्हे नासिक हे १४/१५ वर्षा पासून मोफत वैद्यकिय सेवा पुरवितात. ह.भ.प. संतोष परशुराम पाथरवट यांच्या स्मरणार्थ मोफत चहा वाटप ज्ञानेश्वर संतोष पाथरवट यांनी केली. साबूदाणा प्रसाद सोबत केळी, थंड पाणी याची वाटप पारोळा येथील विशाल प्रकाश पाटील यांनी केली. यावेळी नितीन पाटील शाखा अभियंता सार्वजनीक बांधकाम वि.एरंडोल यांचे कडून केळी वाटप करण्यात आली. यावेळी एरंडोल पो.स्टे. निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एस.टी. महामंडळा तर्फे सुरळीत बस सेवा सुरु होती. नगरपालिके तर्फे अग्निशमनदलाचे वाहन उपलब्ध करून दिले होते. या प्रसंगी संपूर्ण विश्वस्त मंडळ व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. बरेच वरीष्ठ अधिकारी दर्शनासाठी आलेले होते. कार्यक्रम शांततेत पार पडला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह