हृदयद्रावक : घरात नव्हती वीज, मेणबत्तीमुळे लागली आग, होरपळून वृद्धाचा गेला जीव

फेब्रुवारी 18, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । भुसावळ शहरात एक दुर्दैवी घटना घडलीय. शहरातील न्यू सतारे भागातील ओंकारेश्वर मंदिराजवळ घरात एकटेच राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाचा घराला पेटत्या मेणबत्तीमुळे आग लागली. या लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. एकनाथ रघुनाथ कांबळे (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

bhusawal fire home

याबाबत असे की, न्यू सातारा भागात एकनाथ रघुनाथ कांबळे हे एकटे राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून, त्यांना मुलबाळ नव्हते. घरात वीजदेखील नसल्याने ते मेणबत्ती लावत होते. त्यामुळे घराला आग लागली. या आगीत एकनाथ कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. परिसरातील अनिल कांबळे यांनी अग्नीशमन दलाला माहिती कळवली. त्यानंतर बंबाने आग आटोक्यात आणली. परिसरातील नातेवाईक व रहिवाशांनी अंत्यसंस्कार केले.

याबाबत शहर पोलिसात अनिल कांबळे यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे (dysp somnath waghchure), शहरचे निरीक्षक गजानन पडघण, सहाय्यक निरीक्षक संदीप दुणगहू यांच्यासह शहरच्या पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपास शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now