जळगावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

सप्टेंबर 24, 2021 6:05 PM

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या एका ९० वर्षीय वयोवृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शिवराम शंकर सोनवणे (वय-९०) असे मृताचे नाव असून याप्रकरणी  नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

याबाबत असे कि, शिवराम सोनवणे हे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते विधवा सुन व नातवंडे यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा दोन वर्षांपुर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे. त्यांची सुनबाई माहेरी आईवडीलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. काल गुरूवार २३ सप्टेंबर रोजी घरी कुणीही नसतांना त्यांनी बाथरूमच्या कडीकोयंडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ७ वाजता उघडकीला आली.

सायंकाळी सुनबाई घरात आल्यावर हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील, महेश पवार करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now