अरे वाह ! कामगार दिनानिमित्त त्या गुणवंत कामगारांचा करण्यात आला गौरव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यानिमित्त मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेळकर, समुपदेशक रागीब अहमद, सविता हॉस्पिटलच्या आहारतज्ञ डॉ. निशा पाटील, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक नरेश पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रागीब अहमद यांनी “संवाद कौशल्य” या विषयावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. निशा पाटील यांनी “आहार व पंचकर्म चिकित्सा” याबद्दल माहिती दिली. कुंदन खेळकर यांनी कामगार कल्याण मंडळाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी पुरस्कारप्राप्त कामगारांचे अभिनंदन केले. कंपनीचे दैनंदिन कामकाज करताना वक्त्यांनी सांगितलेले संवाद कौशल्य आचरणात आणावे. तसेच आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी जीवनात योग्य आहार व व्यायाम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‌त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता रत्ना पाटील यांनी केले.

पुरस्काराचे मानकरी – जळगाव मंडळ (तंत्रज्ञ संवर्ग)– आनंदा पाटील, भारत चव्हाण, पंकज भावसार, नागेश पारधी, नीलेश शेळके, शरद पाटील, भूषण पाटील, दीपक अदिवाल, अक्तास पठाण, विनायक अहिरराव, अनिल पवार, अविनाश पाटील, अरविंद पाटील, राहुल खैरनार, राजेंद्र पाटील, प्रल्हाद धनगर, आनंद निकम, विनोद सपकाळ, अमोल गुरव, प्रवीण साळी, विलास पाटील, पंकज पवार, मयूर कोल्हे, प्रदीप परदेशी, सुनील पाटील, विकास जाधव, किशोर पवार, धनंजय चौधरी, राहुल लांडगे, अमिन शाह. (यंत्रचालक संवर्ग)– लक्ष्मीकांत पाटील, ज्ञानेश्वर कोळी, रामचंद्र पाटील, संदीप चौधरी, कारभारी केदार, योगेश चौधरी.

धुळे मंडळ (तंत्रज्ञ संवर्ग)– अनिल शेटे, गोपाळ अहिरे, अमोल जाधव, वासुदेव मालचे, ज्ञानेश्वर अहिरराव, प्रणराज मोहिते, सुभाष बाऱ्हे, विजय सैंदाणे, राजेंद्र गोरे, गणेश शिंपी, भूषण मराठे. (यंत्रचालक संवर्ग)– महेश सानफ, जगदीश मानके, सुरेंद्रसिंग गिरासे. नंदुरबार मंडळ (तंत्रज्ञ संवर्ग)– सुमीत शिरसाठ, राजेश बागुल, भीमसिंग वळवी, सुभाष गावित, माणिकराव पावरा, योगेश वसावे, प्रवीणपुरी गोसावी, पंढरी बोराले, विकास सोनवणे. (यंत्रचालक संवर्ग)– देविदास मराठे व मेवालाल कोकणी.