जनसंख्येनुसार आरक्षणाचा कायदा करून ओबीसींना न्याय द्यावा; जळगाव जिल्हा तेली समाजाची मागणी

जून 16, 2021 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करून जनसंख्या नुसार आरक्षणा चा कायदा करून ओबीसींना न्याय द्या. अशी मागणी करणारे निवेदन जळगाव जिल्ह्यातील तेली समाजाच्यावतीने महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत द्वारा सन्माननीय पंतप्रधान भारत सरकार व सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. 

jalgaon teli samaj

जिल्हाध्यक्ष के.डी.चौधरी जळगाव, जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर, जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ निर्मला ताई रामचंद्र चौधरी, जिल्हा महासचिव दत्तात्रय तुकाराम चौधरी, ज्येष्ठ सल्लागार ऍड वसंतराव शिवदास भोलाने, ज्येष्ठ पत्रकार संजय नारायण चौधरी, देवकांत के चौधरी, दशरथ चौधरी, संगीता पाटील यांनी जिल्हाधिकारी  यांना 14 जून रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. 

निवेदन देताना अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या संदर्भात उचित पाऊले उचलून आरक्षणाचा कायदा करण्यासंदर्भात आग्रही मागणी केली. याबाबतीत केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनी एक महिन्याच्या आत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आग्रही प्रतिपादन केले. तसेच सदरच्या भावना सन्माननीय पंतप्रधान व सन्माननीय मुख्यमंत्री यांना कळविण्याची विनंती सुद्धा  जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. 

जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष श्री प्रशांत सुरडकर यांनी पत्रकारांच्या समोर बोलताना सांगितले की एक महिन्याच्याआत कोणतीही कार्यवाही दिसून न आल्यास तेली समाज जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून, ओबीसींना न्याय द्या अन्यथा खुर्च्या खाली करा असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा  आघाडीच्या महिला अध्यक्ष सौ निर्मला ताई चौधरी यांनीही आंदोलनात महिला आघाडीवर असतील असे नमूद करून ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली.

एडवोकेट वसंतराव भोलाने यांनी मंडलआयोगापासून ओबीसींची माहिती देत ओबीसींच्या आरक्षणाला जो आळा बसला याची सविस्तर माहिती देत ओबीसींना न्याय देण्याची गरज प्रतिपादन केली. के .डी. चौधरी यांनी पत्रकारांचे आभार मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now