जळगाव जिल्हा

आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही – आ. एकनाथ खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । भाजपवर मी कधीच टिका केली नाही. पण काही विशिष्ट लोकांमुळे मला पक्ष सोडावा लागला. काही नेते आजही मला छळत आहेत. असे आ.एकनाथराव खडसे म्हणाले. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतील बोलत होते.

आता महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार नाही
आम्ही हिंदूत्त्वासाठी गद्दारी केली असं, गुलाबराव पाटील म्हणत आहेत. पक्ष बदलणं आणि खोके बदलंण हे तंत्र आहे. मी पक्ष बदलला तेव्हा मी आमदार नव्हतो, किंवा कोणत्याही पदावर नव्हतो. तेव्हा भाजपचा राजीनामा दिला होता. हे लोक तर आमदार, मंत्री होते. जे शिंदेंसोबत गेले तिथून खोका संस्कृती आली आणि ती महाराष्ट्रात प्रचलित झाली. जे सर्वे होत आहेत त्यात काय म्हटलं आहे. त्यातील बहुसंख्य सर्वेमध्ये असं आढळून आलंय की आता महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार नाही.

खोके बिके महाराष्ट्राने हे अनुभवलं नाही, २०१४ नंतर राजकारणाची दिशा बदलली, असं गुंडगिरीचं, दहशतीचं वातावरण, केसेस दाखल करण, राज्यात हे जे काही सुरु आहे ते जनतेला आवडणार नाही. आता निर्णय जनतेच्या हातात आहेत. असे एकनाथराव खडसे म्हणाले.

‘भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे-मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषद सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

godavari advt (1)

Related Articles

Back to top button