आता शिवसेनेचा दसरा मेळावा ‘ही’ जाणार कोर्टात
जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | महाराष्ट्र सत्ता संघर्ष सुरू असताना अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठापुढे नेण्यात आली. यातच आता अजून एक प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी पार्क येथे होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा कोणी घेणार हे अजून निश्चित झालं नसल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात जाऊ शकत.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा केवळ काही सभा नसते तर पारंपारिक शिवसैनिकांचा एक उत्सव असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती. यामुळे शिवसेना आणि दसरा मेळावा याचं नातं खूप घट्ट आहे. मात्र आता शिवसेनेत फूट पडली असून दोन गट निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट म्हणतो की, शिवसेना आमची आहे तर एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट म्हणतो की शिवसेना आमची आहे. या दोघांनीही दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. शिंदे गटाकडून तशी मागणीही करण्यात आली आहे.
मात्र ठाकरे यांचा ठाकरे गट देखील या ठिकाणी तयार आहे. ठाकरे गटाला आपली शिवसेना खरी वाटत असल्याने आता त्या ठिकाणी स्वतःचा मेळावा घ्यायचा आहे. यामुळे आता हा वाद चिघळणार व कोर्टात जाणार असे वाटत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीने घेत योग्य तो निर्णय घ्या असा सल्ला दिला आहे. तर विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ठाकरे हेच हा मेळावा घेतील असेच भाकीत केले आहे. यामुळे हे प्रकरण कोर्टात जातं की सबुरीने सुटतं आणि नक्की यात कोण जिंकत? हे पहाणे उत्सुकतेचे करणार आहे