जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । प्रवाशांना अधिकाधिक सेवा-सुविधा पुरवण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने भुसावळ रेल्वे स्थानकावरील उत्तर बाजूच्या पार्किंगमध्ये अजब फतवा काढला आहे. ‘दुचाकी वाहनतळाचा ठेका संपल्याने वाहन मालकांनी वैयक्तिक जोखमी वर वाहन पार्किंग करावे’ असा हा फतवा आहे. तशी सूचना देणारा फलक देखील लावला आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागातील दुचाकी वाहनतळाचे कंत्राट मुदतीपूर्वीच बंद झाले. त्यामुळे नवीन प्रक्रिया सुरु आहे. असे असले तरी अनेक प्रवासी, रेल्वे कर्मचारी येथे दुचाकी पार्क करतात. तेथे पर्यायी व्यवस्था न करताच या वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेने झटकली आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून वाहनतळात पार्क केली जाणारी वाहने असुरक्षित आहेत. त्यामुळे पे अँड यूज तत्त्वावर पार्किंग सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रक्रियेला गती द्यावी.