⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पुढील चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र पूर्वींमोसमी पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । मागील काही दिवसापासून किंचित चढ-उतार दिसून येतेय. सध्या पूर्वमाेसमी पावसाचे संकेत असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे जळगावचा पारा ४० अंशावर आला आहे. शुक्रवारी जळगावात तापमान ४० अंशापर्यंत नोंदविले गेले. काही दिवसापूर्वी सकाळ ४० अंशावर जाणारे तापमान आता ३५ अंशावर आल्याने यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय.आज सकाळी १० वाजेपर्यत पारा ३५ अंशावर होता. दरम्यान, पुढील चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र पूर्वींमोसमी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

जळगावात पारा काही दिवसापासून घसरला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील पारा तब्बल ४५ अंशावर गेला होता. तर जिल्ह्यातील भुसावळ येथे राज्यातील सर्वाधिक ४७ अंशावर अधिक तापमानाची नोंद झाली होती. सकाळी १० वाजेपासूनच तापमानाचा पारा ४० अंशावर जात होता. त्यामुळे असह्य उकाडा जाणवत होता. पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून पारा ४० अंशापर्यंत राहणार पारा गुरुवारी ४०.८ अंशांवर गेला होता. तसेच अधूनमधून असे ढगाळ वातावरण हाेते. तरीदेखील उकाड्यात प्रचंड वाढ झाली हाेती. दरम्यान, शुक्रवारपासून पारा पुन्हा किंचित घसरून कमाल तापमान ४० अंशांवर असताना किमान तापमान २७ अंशापर्यंत खाली आले.

मान्सूनच्या आगमनापूर्वी देशभरात वातावरण बदलले आहे. महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात गेल्या चार दिवसांपासून पूर्वमाेसमी पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १५ ते १७ किमीपर्यंत तर तापमान चाळीशीपर्यंत राहू शकते.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला – ३५ अंश
१२ वाजेला – ३७ अंश
१ वाजेला- ३८ अंशापुढे
२ वाजेला – ३९ अंश
३ वाजेला – ३९ अंशापुढे
४ वाजेला – ३९ अंश
५ वाजेला – ३८ अंश
६ वाजेला – ३७ अंश
७ वाजेला – ३४ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३३ तर रात्री ९ वाजेला ३२ अंशावर स्थिरावणार.