---Advertisement---
पारोळा

गावातील मुलभुत सुविधेची एकही कामे प्रलंबित राहु देणार नाही : आ. चिमणराव पाटील

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । मंजुर कामांसह आपल्या गावातील उर्वरीत कामे प्राधान्याने पुर्ण करण्याचा मानस आहे. सरकार आपले असल्याने गावातील एकही मुलभुत सुविधेची व इतर कामे प्रलंबित राहु देणार नाही, असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.

MLA Chimanrao Patil jpg webp

पारोळा तालुक्यातील सावरखेडे व वेल्हाणे खु. येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवार दि.२८ रोजी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतींकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रा. आर.बी.पाटील, जि.प. सदस्य रोहीदास पाटील, बाजार समिती उपसभापती दगडु पाटील, डॉ. दिनकर पाटील, संचालक चतुर भाऊसाहेब पाटील, पांडुनाना पाटील, माजी सरपंच राजु पाटील, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन सखाराम चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, वेल्हाणे येथील राजेंद्र पाटील, शिवरे येथील पंढरीनाथ पाटील, तरवाडे सरपंच सुमित पाटील, बोळे येथील साहेबराव गिरासे, ढोली येथील यशवंत पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

---Advertisement---

या कामांचे झाले भूमिपूजन
आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून वेल्हाणे खु. येथे गावात ३ हायमास्ट (८.५५ लक्ष), जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात पेव्हर ब्लाॕक बसविणे (१० लक्ष), रस्ता काँक्रीटीकरण (३ लक्ष), दहणभुमिची सुधारणा करणे (३ लक्ष), १ हायमस्ट लॅम्प लावणे (२.५५ लक्ष) तर मौजे सावरखेडे येथे दलित वस्ती अंतर्गत १ हायमास्ट लॅम्प लावणे (२.५५ लक्ष), आमदार निधी अंतर्गत भिल्ल वस्तीत मारोती मंदीराजवळ सभामंडप बांधणे (१० लक्ष), १ हायमास्ट लावणे (२.५५ लक्ष), मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत वेल्हाणे ते करमाडपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (२ कोटी ५६ लाख) आदी कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचे भूमिपूजन रविवारी झाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---