⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

आता काेणीही शिवसेना सोडून जाणार नाही – संजय सावंत

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । जाणारे सर्व लाेक गेले आहेत. त्या ठिकाणचे सर्व काही संपले आहे. त्यामुळे आता नव्याने काेणी कशाला पत्रावळी उचलायला जाईल अशा शब्दात शिवसेनेतुन आता कोणी जाणार नाही असे स्पष्ट संकेत शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिले.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी तालुका दाैऱ्यांवर भर दिला आहे. शिवसैनिकांशी थेट संवाद साधत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाकडे सर्वकाही संपले आहे, त्यामुळे आता तिकडे पत्रावळी उचलायला काेणी कशाला जाईल असा दावा सावंत यांनी केला आहे.


शिवसेना पक्षाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दाेन गटात विभागणी झाली आहे. माेठ्या प्रमाणात आमदार व खासदार शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला माेठा धक्का मानला जात आ हे. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. दरम्यान आमदारांचे समर्थकांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यास सुरुवात केली. जळगाव ग्रामीण मतदार संघात धरणगाव व जळगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना समर्थन दिले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत जळगावात आले.


शिंदेंसाेबत गेलेल्यांना ५० खाेके मिळाले. आम्ही देऊ शकत नाही. आमदारांनी आम्ही राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. पक्षातून जाणारी सर्व लाेक गेली आहेत. त्या ठिकाणचे सर्व काही संपले आहे. त्यामुळे आता नव्याने काेणी कशाला पत्रावळी उचलायला जाईल अशा शब्दात पक्षातून हाेणारी गच्छंती थांबल्याचा दावा सावंत यांनी केला.