ना. गुलाबराव पाटलांचा आदिवासी महिलेला मदतीचा हात

ऑक्टोबर 17, 2022 2:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । पाळधी येथील शासकीय  विश्रामगृहात रविवारी जनता दरबार सुरु असताना एक आदिवासी महिला आपल्या कडेवर लहान बाळ घेऊन त्या गर्दीत दिसली. विशेष म्हणजे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गर्दीतून त्या आदिवासी महिलेची समस्या काय आहे? याविषयी विचारणा केली. जन्मजात बाळाला दृष्टीदोषाची समस्या असल्याचे सांगताच ना. गुलाबराव पाटील यांनी उपचारासाठी तात्काळ १० हजाराची मदत करीत एक हात मदतीचा देत बाळाचा पुढील उपचाराची जबाबदारी स्वीकारली.

jalgaon 2022 10 17T143016.921 jpg webp

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाळधी येथील शासकीय  विश्रामगृहात नेहमीच जनता दरबार भरतो. या दरबारात आपल्या गावातील समस्या मांडत असतात. रविवारी देखील नागरिकांचा जनता दरबार भरल्याने त्या गर्दीत धरणगाव तालुक्यातील फुलपाट येथील भोई समाजातील आदिवासी महिलाही आपली कैफियत घेऊन आली होती. एकीकडे कार्यकर्त्यांसह नागरिकही विविध समस्या घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी जमले होते. त्या गर्दीत या आदिवासी महिलेचाही सहभाग दिसून आला.

Advertisements

एवढ्या मोठ्या गर्दीत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना इशारा करीत त्या महिलेला बोलावून घेत काय समस्या आहे? त्यावर आदिवासी महिला म्हणाली की, मला झालेल्या बाळाला जन्मजात डोळ्यांची समस्या आहे. त्याला व्यवस्थित दिसत नाही. त्याला दृष्टीदोष व ह्द्याची समस्या आहे. पालकमंत्र्यांनी त्या महिलेचे म्हणणे ऐकून घेेत तात्काळ १० हजाराची मदत केली. तसेच बाळाच्या पुढील उपचाराची जबाबदारी उचलली. ना. गुलाबराव पाटील यांनी देताच ताई भावूक होऊन पालकमंत्र्यांचे आभार मानले.

Advertisements

आतापर्यंत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाभाऊ हे दिसायला करारी बाणा असलेले कणखर मंत्री म्हणून ना. गुलाबराव पाटील यांची छबी लोकांसमोर असली तरी अश्या अनेक घटनेच्या निमित्ताने माणुसकीच्या नात्याबरोबरच एक संवेदनशिल पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील असल्याचे चित्र नागरिकांना सतत दिसून येते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now