⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | शॉर्टसर्किटने नऊ बिघे उसाचे पीक जळून खाक, साडे सात लाखांचे नुकसान

शॉर्टसर्किटने नऊ बिघे उसाचे पीक जळून खाक, साडे सात लाखांचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथे शॉट सर्किटमुळे आग लागून ९ बिघा शेतातील ऊस जळून शेतकऱ्याचे तब्बल ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले.

या संदर्भात गोकुळ पाटील (वय ४८ रा. वाघळुद बुद्रूक, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या भावाच्या नावे वाघळुद बु. शिवारातील वाघळूद-बोरखेडा शिव रस्त्यालगत शेत गट नं. ६९/३,६९/४,६९/५ मध्ये ९ बिघे शेत आहे.
या शेतात त्यांनी ऊस लावलेला होता. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन आगीत ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ७ लाख ४० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी मोती पवार करत आहेत.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह