निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

जून 12, 2025 7:17 AM

मासिक पाळी कापडमुक्त अभियान राबविणार : महिलांमध्ये केली जनजागृती

nidhi foundesion

जळगाव लाईव्ह न्यूज । मासिक पाळी विषयावर कार्य करणाऱ्या निधी फाऊंडेशनचे ‘मासिक पाळी कापडमुक्त अभियान’ अंतर्गत म्हसावद गावाजवळील खर्चीनगर तांडा दत्तक घेतला आहे. निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी गावातील महिलांशी चर्चा करून त्यांना सॅनिटरी नॅपकिन वितरित करून मासिक पाळी विषयी जनजागृती केली.

निधी फाउंडेशनने ‘मासिक पाळी कापड मुक्त अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत, ते मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन पुरवतात. जळगाव जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत असून आजवर पोखरीतांडा, खापरखेडा याठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट स्त्रिया मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता राखू शकतील आणि त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचतील. तसेच, त्यांना मासिक पाळीच्या काळात वापरण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे आहे.

मासिक पाळी कापडमुक्त अभियान अंतर्गत यावर्षासाठी म्हसावद गावाजवळील खर्चीनगर तांडा दत्तक घेण्यात आला आहे. वर्षभर गावातील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वितरित करण्यात येणार असून त्यांना मासिक पाळी आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देणार आहे. निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात कापड पूर्णपणे कोरडे होत नसल्याने त्याचा वापर केल्यास आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य दक्षता घेत कापड ऐवजी सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

खर्चीनगर येथे राबविलेल्या उपक्रमाला निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते, शीतल चिंचोले, भारती कुमावत, सिद्धार्थ अहिरे, यश विसपुते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment