ATM ते रेल्वे तिकिटांपासून.. 1 मे 2025 पासून होणार हे महत्त्वाचे बदल, आताच जाणून घ्या

एप्रिल 30, 2025 5:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२५ । दर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक महत्वाचे बदल होतात. त्यानुसार 1 मे 2025 पासून देशात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्या दैनंदिन जीवनावर होईल. म्हणून, तुम्हाला या नवीन नियमांबद्दल आधीच माहिती असणे महत्वाचे आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. हे बदल तुमच्या व्यवहारांवर आणि सेवांवर थेट परिणाम करतील, जसे की एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा, बँक शुल्क आणि गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल. चला तर मग जाणून घेऊया की मे महिन्यापासून काय बदल होऊ शकतात.

1st May rule

ATM मधून पैसे काढणे महाग होईल
1 मे पासून मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडली गेली तर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी जमा करण्यास किंवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जातील. रिझर्व्ह बँकेच्या नव्या बँकिंग नियमानुसार रोख पैसे काढण्याचे शुल्क आता प्रति व्यवहार रु. 17 वरून र. 19 पर्यंत वाढतील तर, बॅलन्स चेकवरील शुल्क प्रति व्यवहार रु. 6 वरून रु 7 पर्यंत वाढवले जातील.

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल
१ मे २०२५ पासून रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना नवीन प्रणालीनुसार तयारी करावी लागेल.
आता वेटिंग तिकिटे फक्त सामान्य कोचमध्येच वैध असतील, म्हणजेच स्लीपर आणि एसी कोचमध्ये वेटिंग तिकिटांवर प्रवास करणे शक्य होणार नाही. याशिवाय, आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे, म्हणजेच आता तुम्हाला तुमचे तिकीट ६० दिवस आधीच बुक करावे लागेल. रेल्वे तीन प्रमुख शुल्कांमध्ये वाढ करू शकते, ज्यामुळे भाडे आणि परतावा प्रक्रिया महाग होऊ शकते.

RBI योजना लागू केली जाईल
आता १ मे २०२५ पासून देशातील ११ राज्यांमध्ये “एक राज्य, एक आरआरबी” योजना लागू केली जाईल. याचा अर्थ असा की प्रत्येक राज्यात सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्र करून एक मोठी बँक तयार केली जाईल. यामुळे बँकिंग सेवांमध्ये आणखी सुधारणा होईल आणि ग्राहकांना अधिक सुविधा मिळतील. हा बदल आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थानमध्ये लागू असेल.

गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. यावेळीही १ मे रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ किंवा घट होऊ शकते. किमतीतील बदलाचा परिणाम सामान्य माणसाच्या मासिक बजेटवर होईल.

FD आणि बचत खात्याच्या नियमांमध्ये बदल
1 मे 2025 पासून मुदत ठेव (FD) आणि बचत खात्याशी संबंधित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल दिसून येतील. माहितीनुसार, या बदलांमध्ये व्याजदरांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता देखील आहे. पण, आतापर्यंत बँकांनी एफडी आणि बचत खात्याच्या व्याजदरांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

रेशन कार्ड ई-केवायसी अनिवार्य
रेशनकार्डधारकांना सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. दरम्यान, रेशनकार्डधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, म्हणजेच धारकाचे नाव रेशनकार्डमध्ये असेल तर त्याला ई-केवायसी करणे अनिवार्य असेल, ज्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment